Ramrao Patil Ayurved College & Hospital

Shree Baliraja Shikshan Sanstha Someshwar, Sanchalit

Ramrao Patil Ayurved College & Hospital

Purna, Tq. Purna, Dist. Parbhani - 431511 (Maharashtra)

Shri Baliraja Shikshan Sanstha, Someshwar

Rashtriyaratna Shri. Laxmanraoji Golegaonkar

(Founder Director)

Shri. Tushar Kashinathrao Dudhate
(Golegaonkar)

(Chairman)

माझ्या वडिलांकडे सतत परिसरातील लोकांची अर्थात काही कामानिमित्त ये जा असायची. तेव्हा आम्ही त्यांची चहादारी व जेवण ही कामे करायचो. तेव्हापासूनच शेतकऱ्यांच्या जीवनात किती संघर्ष व आर्थिक ओढाताण असते हे जवळून पाहिले.मी जेव्हा घरातील कर्ता पुरुष झालो तेव्हापासून म्हणजेच गेल्या चाळीस वर्षांपासून शेतकरी व कामगारांच्या चळवळीचा एक प्रमुख भागच नाही तर माझ्या जीवनाचं ते ध्येय बनलं.
माझ्या मनात सतत शेतकऱ्यांची मूलं शिकली पाहिजेत याची खंत असायची कारण वडिलांनी मला खूप प्रयास करूनही मी शाळेत गेलोच नाही.अर्थात माझे शिक्षण पुर्ण झाले नाही. हीच खंत भरून काढण्यासाठी आणि शेतक-यांच्या मुलांना मोफत शिक्षण भेटले पाहिजे. या भावनेने व “इडा पीडा जाऊ दे ! बळीच राज्य येउ दे ” ह्या बिरुदाने मी कामाला लागलो. 1978 ला श्री बळीराजा शिक्षण संस्था सोमेश्वर या संस्थेची स्थापना केल्यानंतर ग्रामीण भागातील मुला-मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्राथमिक ते महाविद्यालयीन पातळीवरचे शिक्षण मिळण्यासाठी विविध शाळा- महाविद्यलयांची स्थापना करण्यात आली.
इ.स.2000 मध्ये बळीराजा परिवाराच्या माध्यमातून रामराव पाटील आयुर्वेद महाविद्यलयाची पुर्णा ता.पुर्णा जि.परभणी येथे स्थापना करण्यात आली. आयुर्वेद ही आपल्या देशाची मूळ पॅथी आहे. अजूनही राना – वनात असलेल्या औषधी वनस्पतींबाबत आपण अनभिज्ञ आहोत. त्याचा शोध घेऊन त्याचा उपयोग जनकल्याणासाठी व्हावा म्हणून महाविद्यालयाच्या वतीने मूलभूत संशोधन कार्य हाती घेण्याचा भविष्यातील उद्देश आहे. आज माझ्या शेतकऱ्यांची मुलं- मुली ग्रामीण भागातून दहावी ,बारावी व महाविद्यालयीन शिक्षण तर घेत आहेतच शिवाय डॉक्टर ही होऊ लागलेत. काम करत गेलो अन् कसं जमत जमत गेलं पहा. तेव्हढं सैनिकी शाळा सुरू करायचं राहून गेलंय होईल तेही. पण चला माझ्या शिक्षण संस्थेतून ही मुलं शिकताहेत आज पंचवीस हजार मुलं वेगवेगळ्या ठिकाणी कामं करताहेत,ह्याचा मला अभिमान आहे व माझ्या संस्थेत हजारो मुलं नोकरीस आहेत. चला हे असं चालू आहे जमत जमत जमेल अजूनही काम होतील हे मला नव्वदीच्या घरात माझं वय गेलेलं असलं तरीही मी काही तरी अजून करू शकेन असं वाटतंय ।
यासंदर्भातील मोठे ज्ञान विविध आयुर्वेदीय ज्ञान प्राचीन ग्रंथ व ग्रामीण लोकजीवनात आहे. त्याचे पुनर्जीवन करून आपल्या पर्यावरणातील विविध औषधी वनस्पतींचा शोध घेऊन लोकांना त्याचा उपयोग व्हावा ही भूमिका आयुर्वेद महाविद्यलयाच्या स्थापने पाठीमागे आहे.